

"राज्य सहकारी बँकेची 'नफे'दार भरारी! ७०२ कोटींचा निव्वळ नफा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा; विद्याधर अनास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली नवा विक्रम"
Sakal
पुणे : सामाजिक बांधिलकी आणि सहकाराच्या मूल्यांना जपत राज्य सहकारी बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ७०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवत बँकिंग क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. सातत्यपूर्ण आर्थिक वाढ, सुयोग्य जोखीम व्यवस्थापन आणि तांत्रिक आधुनिकीकरणाच्या बळावर बँकेने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.