नेवेकरवाडीत ‘विद्याव्रत’ शिबिरातून संस्काराची जोपासना

नेवेकरवाडीत ‘विद्याव्रत’ शिबिरातून संस्काराची जोपासना

Published on

‘विद्याव्रत’ शिबिरातून संस्कारांची जोपासना

नेवेकरवाडीत सातवे पर्व; विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आनेवाडी, ता. ६ : बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे बालसंस्कार आणि वाचनसंस्कृती कमी होत चालल्याची चिंता व्यक्त केली जाते. अशा स्थितीत नेवेकरवाडी (ता. जावळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निवासी विद्याव्रत शिबिर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि वाचनाची गोडी निर्माण करण्याचे कार्य करत आहे. यंदा या शिबिराचे सातवे पर्व उत्साहात झाले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक नितीन मोहिते, उपशिक्षक शेखर रोकडे, तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. पाच दिवस चाललेल्या या निवासी शिबिरात विद्यार्थ्यांची दिनचर्या सकाळी योग, प्राणायाम आणि वाचनाने सुरू होत होती. दिवसाच्या विविध सत्रांमध्ये प्रेरणादायी विचार, व्याख्याने आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
शिबिरादरम्यान भारुड, ‘जाऊया कवितांच्या गावा’, गझल सादरीकरण, पारंपरिक खेळ, रामायण-महाभारत यांसारख्या कथांचे वाचन, तसेच टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक आणि टिकाऊ वस्तू तयार करण्याचे उपक्रम घेण्यात आले.
या उपक्रमाचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, उमेश मोरे, उस्मान मनेर, मिलन मुळे, केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप, वंदना गंगावणे, सुभाष दुटाळ तसेच ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

----------------------------------

कोट
बाल वयातच मुलांना योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. मोबाईल व टीव्हीमध्ये गुंतलेल्या आजच्या पिढीत वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकासातून संस्कारित पिढी घडावी, या उद्देशाने गेली सात वर्षे या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यासाठी ग्रामस्थ, पालक, महिला, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

- नितीन मोहिते, मुख्याध्यापक.

---------------------------------

02420
नेवेकरवाडी : येथे विद्याव्रत शिबिरात सहभागी विद्यार्थी. (प्रशांत गुजर : सकाळ छायाचित्रसेवा)

------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com