विंग कोळे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विघ्नहर्ता संघ विजयी श्री. घाडगेनाथ यात्रेनिमित्त आयोजन

विंग कोळे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विघ्नहर्ता संघ विजयी श्री. घाडगेनाथ यात्रेनिमित्त आयोजन

Published on

कोळे प्रीमियर लीगमध्ये ‘विघ्नहर्ता’ विजेता

घाडगेनाथ यात्रेनिमित्त क्रिकेट स्पर्धा; ‘सिद्धिविनायक’ उपविजेता

विंग/कोळे, ता. ४ ः कोळे (ता. कऱ्हाड) येथील श्री संत घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेनिमित्त मोरया स्पोर्टसतर्फे घेण्यात आलेल्या कोळे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विघ्नहर्ता संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेता ठरला. प्रतिस्पर्धी संघावर मात करताना क्रिकेट शौकिनाचे लक्ष वेधले. २२ हजारांची रोकड व चषकावर संघाने मोहोर उमटवली.
स्पर्धेत विघ्नहर्ता विरुद्ध सिद्धिविनायक क्रिकेट संघात अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायक संघाने तीन षटकांत ३२ धावा केल्या. कर्णधार शुभम कांबळेच्या नेतृत्वात अवघ्या १.५ षटकांत विघ्नहर्ता संघाने हे आव्हान लीलया पेलले. २२ हजार रोकडसह या वर्षीचा चषक पटकावला. संघ मालक मुराद देसाई यांनी संघाचे कौतुक केले. संघमालक अक्षय शिनगारे व सनी शिनगारेच्या नेतृत्वात सिद्धिविनायक संघाला दुसरा क्रमांक मिळाला. १६ हजार रोख व चषक देऊन त्यांना गौरविले. मयुरेश्वर क्रिकेट संघाने तृतीय क्रमांकाचे ११ हजार रोख व पारितोषिक पटकावले. स्पर्धा यशस्वितेसाठी प्रीतेश लटके, संकेत कराळे, शुभम कांबळे, करण शिंदे, भूषण सपकाळ, दीपक शिनगारे, परशुराम साळुंखे, धीरज पवार, गणेश चव्हाण, फिरोज खाटीक, आकाश माळी आदींनी परिश्रम घेतले. घाडगेनाथ पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र चव्हाण, संचालक पांडुरंग सावंत, माजी सरपंच भाग्यश्री देसाई, साहेबराव देसाई, महेश पाटील, उत्तम पाटील, श्रीकृष्ण पाटील, समाधान शिनगारे, अभिजित चव्हाण, संजय माळी यांच्यासह क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. मंगलमूर्ती स्पोर्ट्स, गजानन स्पोर्टस, एकदंत संघाने अनुक्रमे चाैथा ते सहाव्या क्रमांकाचे विजेते ठरले. उमेश पवार व सहकाऱ्यांनी पंच म्हणून काम पाहिले. श्रीकांत साबळे यांनी स्पर्धेचे समालोचन केले.


B02174
कोळे ः क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस व चषक स्वीकारताना विघ्नहर्ता संघाचे खेळाडू. त्यावेळी समिती सदस्य.
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com