गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
Published on

गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
विजापूर नाका पोलिसांची कारवाई; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर, ता. २१ ः गावठी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी इंडीमधील (जि. विजयपूर) दोघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी (वय ३९, रा. शांतेश्वर गल्ली, इंडी), आईस्क्रीम विक्रेता घनःश्याम दल्लीचंद जाट (वय २७, मूळ रा. भीलवाडा, राजस्थान, सध्या रा. बिरप्पानगर, इंडी) अशी त्यांची नावे आहेत.
१९ ऑगस्ट रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांना विजयपूर येथून सोलापूरकडे दुचाकी (केए २८/ एचएफ २३३६) वरून एकजण येत असून त्याच्याकडे गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे असल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने नवीन विजापूर नाक्याजवळ सापळा रचून पहाटे २.२६ च्या सुमारास मंजुनाथ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
चौकशीत मंजुनाथ याने हे पिस्तुल मित्र घनःश्याम जाट याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने इंडी येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला गुरुवारी (ता. २०) अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या पथकात सहायक फौजदार अप्पासाहेब पवार, हवालदार सचिन हार, अजय परदेशी, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर भिसे, गणेश शिर्के, कॉन्स्टेबल संतोष माने, स्वप्नील जाधव, राजू पवार, समाधान मारकड, अमृत सुरवसे, राहुल विटकर, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोर्सेगाव, श्रीरंग काशीद यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com