गाडे यांना १५ वर्षांपासून झेंडूचे पीक ठरले फायद्याचेच; दसरा-दिवाळीमध्ये विकली दीड टन झेंडूची फुले

महेंद्र शिंदे
Sunday, 15 November 2020

कांजळे येथील गाडे यांना मात्र सलग १५ वर्ष झेंडूच्या फुलांच्या शेतीचे गणित फायद्याचे ठरले आहे. यावर्षीही त्यांनी 30 गुंठे क्षेत्रावर झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले आहे. यंदाही दसरा आणि दिवाळीला त्यांचा झेंडू भाव खाऊन गेला आहे. गाडे यांनी यावर्षी आत्तापर्यंत दीड टन झेंडूच्या फुलांची विक्री केली आहे. त्यातून सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

खेड-शिवापूर : कांजळे (ता.भोर) येथील विकास गाडे हे गेल्या १५ वर्षांपासून दरवर्षी शेतात झेंडूचे पिक घेत आहेत. विशेष म्हणजे जवळ असलेली फुल बाजारपेठ, बाजारभाव पाहून फुले तोडण्याची अचूक वेळ आणि प्रसंगी फुलांची हातविक्री यामुळे गेल्या १५ वर्षांत गाडे यांना झेंडूचे पीक फायद्याचेच ठरले आहे. यावर्षीही दसरा आणि दिवाळी त्यांनी दीड टन झेंडूची फुले विकली असून सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. 

झेंडूच्या फुलांचे दर अनिश्चित असतात. दसरा आणि दिवाळी या दोन प्रमुख सणांसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र या दोन सणाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक होते. त्यामुळे बहुतेक वेळा शेतकऱ्यांना झेंडूच्या फुल उत्पादनात नुकसान सहन करावे लागते. मात्र कांजळे येथील गाडे यांना मात्र सलग १५ वर्ष झेंडूच्या फुलांच्या शेतीचे गणित फायद्याचे ठरले आहे. यावर्षीही त्यांनी 30 गुंठे क्षेत्रावर झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले आहे. यंदाही दसरा आणि दिवाळीला त्यांचा झेंडू भाव खाऊन गेला आहे. गाडे यांनी यावर्षी आत्तापर्यंत दीड टन झेंडूच्या फुलांची विक्री केली आहे. त्यातून सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

जवळ असलेले फुल मार्केट, त्यामुळे तोडणी आणि विक्रीची वेळ आणि प्रसंगी फुलांची हात विक्री यामुळे गेल्या १५ वर्षात झेंडूचे पीक फायद्याचे ठरत असल्याचे गाडे यांनी सांगितले.

गाडे म्हणाले, फुलांचे मार्केट जवळ असल्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे सणाच्या अगोदर दोन-तीन दिवस बाजारात चढ उतार होत असतो. त्यामुळे बाजारभावाचा अंदाज घेऊन ताबडतोब फुले मार्केटला नेता येतात. त्यामुळे फुलांना योग्य बाजारभाव मिळतो. तर बाजारभावाचा अंदाज घेऊन प्रसंगी फुलांची हातविक्रीपण करतो. त्यामुळे गेल्या १५ वर्षात आत्तापर्यंत झेंडूच्या फुल पिकात फायदाच झाला आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas Gaade from Kanjale has been harvesting marigold every year for the last 15 years