विक्रम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम संपन्न.  विक्रमसिंह शिंदे मित्र मंडळाचा उपक्रम.

विक्रम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम संपन्न. विक्रमसिंह शिंदे मित्र मंडळाचा उपक्रम.

Published on

KRU26B02590
कुर्डू (ता. माढा) ः माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रगती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये साहित्य वाटप करताना पदाधिकारी.

विक्रमसिंह शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

कुर्डू, ता. ५ ः माढा तालुक्याचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विक्रम शिंदे मित्र मंडळाच्या वतीने हे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना चे संचालक घाडगे आबा, माढा मार्केट कमिटीचे संचालक नागेश खटके, तालुकाध्यक्ष अमोल नलवडे, कुर्डू गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण खर्चे, मुन्ना आनंतकवळस, संदीप देशमुख, प्रशांत नलवडे, गोरख मस्के, अमोल नवले, रामभाऊ नवले, टाकळीचे सरपंच तानाजी सलगर, किशोर सलगर, सचिन लोंढे तसेच वृद्धाश्रमाचे संचालक दशरथ बुवा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध संस्थांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. कुर्डुवाडी येथील मूकबधीर व मतिमंद शाळेत सुमारे १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच प्रगती पब्लिक स्कूल येथे १३० विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल यांचे वाटप करण्यात आले. गोविंद वृद्धाश्रम येथे फळे वाटप करण्यात आले. एकूण ७० जणांना या किराणा किटचे वाटप करण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com