Katraj News : कात्रजघाट जंगल वाचवण्यासाठी विक्रांत सिंह यांनी यांचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

गेल्या पाच वर्षांपासून विक्रांत सिंह आणि त्यांची टीम स्वखर्चाने कात्रज घाट जंगलातील लाखो किलो जैविक कचऱ्याची स्वच्छता करत आहेत.
Vikrant Singhs Hunger Strike to Save Katraj Ghat Forest

Vikrant Singhs Hunger Strike to Save Katraj Ghat Forest

sakal

Updated on: 

कात्रज - कात्रज घाटातील जंगल वाचवण्यासाठी आणि वन विभागाच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात पर्यावरणप्रेमी तथा 'इंकलाब जयते'चे विक्रांत सिंह यांनी सुरू केलेल्या बेमुदत प्राणांतिक उपोषणाला आज तीन दिवस पूर्ण झाले आहेत. भारती विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील शहीद स्थळ येथे हे उपोषण सुरू असून, प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल घेण्यात न आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...