

RAS26A02350
पुणे : मामाच्या गावच्या सफरीचा आनंद लुटताना संस्कार वसतिगृहातील विद्यार्थी.
‘संस्कार’मधील विद्यार्थ्यांनी
लुटला मामाच्या गावचा आनंद
राशीन, ता. १८ : येथील संस्कार वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मामाच्या गावच्या सफरीचा पुण्यात आनंद लुटला. पुण्यातील सेवा मित्र मंडळाने सुटीमध्ये आजोळी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
वसतिगृहाचे अध्यक्ष शरदचंद्र आढाव, सचिव अश्विनी आढाव यांच्या पुढाकारातून या सफरीचे आयोजन केले होते. तीन दिवशीय सहलीत विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी विविध खेळ खेळत, गणपतीची आरती केली. जेवनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर उंट, घोड्यावर बसून सवारी केली. गाण्याच्या तालावर मनसोक्त धमाल केली. दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर सेवा मित्र मंडळ टिमने मुलांना शिवसृष्टीला नेले. तेथे मुलांनी वेगवेगळे शिलालेख, तलवारी, तोफा, माहितीचे तक्ते शिल्प पाहिले. त्याचबरोबर किल्ल्याविषयी माहिती शिवसृष्टी येथील निकिता महागडे व अनिता जाधव यांनी दिली. तिसऱ्या दिवशी मुलांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, तसेच दत्त मंदिर देवदर्शन घेतले. जादुचे खेळ व सामाजिक विषयांवर प्रबोधन, मुलांचे आरोग्य तपासणीनंतर फॅन्सी ड्रेसची स्पर्धा घेण्यात आली. अशाप्रकारे विद्यार्थ्यानी सहलीची मजा लुटली. सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांचे संस्कार वसतिगृहातर्फे शरदचंद्र आढाव यांनी सर्वांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.