दुचाकीस्वारास अडवून रॉड, हातोडीने हल्ला, चार तोळे सोने गहाळ

दुचाकीस्वारास अडवून रॉड, हातोडीने हल्ला, चार तोळे सोने गहाळ
Published on

गावात मंडळ स्थापण्यावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी, सहाजणांविरुद्ध गुन्हा

कुचन प्रशालेजवळील घटना, दोघे जखमी, चार तोळे सोने गहाळ, २१०० रुपये काढून घेतले

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ ः गावात मंडळ स्थापन केल्याच्या कारणावरून दोन गटांत लोखंडी रॉड, हातोडा व सत्तुरने हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाच ते रात्री ८.२० या कालावधीत कुचन प्रशालेजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांच्या आठजणांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या घटनेत जावेद शेख, अनिकेत जाधव, विजय सलवदे, सिद्धार्थ बनसोडे व संदेश हाटकर (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जखमी स्वप्नील धोंडीराम गायकवाड (रा. शिक्षक हौसिंग सोसायटी, सदर बझार) यांनी फिर्याद दिली आहे. ते शांती चौकातून दुचाकीवर बोरामणी नाक्याकडे निघाले होते. सिद्धार्थ व संदेश या दोघांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. कुचन प्रशालेच्या मागील गेटनजीक गतिरोधकाजवळ त्यांना संशयितांनी अडविले. जावेद व अनिकेत यांनी लोखंडी रॉडने त्यांच्या दोन्ही गुडघ्यावर व नडगीवर मारहाण केली. विजय याने हातोड्याने डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांच्या हाताला लागला. या मारहाणीत ते जखमी झाले. तसेच त्यांच्याकडील दोन तोळे व एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, गळ्यातील एक तोळ्याची साखळी असे चार तोळ्याचे सोने गहाळ झाले.
दुसऱ्या घटनेत जखमी विजय येलेश्‍वर सलवदे (रा. बक्षीहिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून स्वप्निल गायकवाड याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजय हे कुचन प्रशालेजवळ थांबले होते. तेव्हा दुचाकीवर तेथे आलेल्या संशयितांनी तू आमच्याविरुद्ध गावात मंडळ का स्थापन केला, अशी विचारणा करीत शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गाडीला अडकवलेली सत्तुर काढून त्यांच्या पाठीवर व डाव्या हातावर वार केला. त्यात ते जखमी झाले. तसेच संशयितांनी त्यांच्या खिशातील २१०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक रामप्पा चानकोटी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com