संपूर्ण गावाची स्वच्छता करून साजरा केला मुलाचा वाढदिवस
KMT26B00938
कोरली (ता. मोहोळ) : येथे मुलाच्या वाढदिवशी संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यासाठी जेसीबीची पूजा करताना दत्तात्रय म्हमाणे, मदनसिंह म्हमाणे व उपस्थित मान्यवर.
---
गावस्वच्छता उपक्रमाने केला
मुलाचा वाढदिवस साजरा
कोरवलीतील म्हमाणेंची सामाजिक बांधिलकी
सकाळ वृत्तसेवा
कोरवली, ता. ६ : कोरवली (ता. मोहोळ) येथील शिवगौरी उद्योग समूहाचे मालक दत्तात्रय म्हमाणे यांनी त्यांचा मुलगा मदनसिंह याचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमाने साजरा करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. औपचारिक शुभेच्छा, पुष्पगुच्छ, केक व जल्लोष टाळत त्यांनी गावस्वच्छतेला प्राधान्य दिले.
म्हमाणे यांनी स्वखर्चाने एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर भाड्याने लावून संपूर्ण गावाची स्वच्छता करून घेतली. रस्त्यावरील काटेरी झुडपे, गल्लीबोळातील मातीचे ढिगारे हटवून गाव परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच उन्हाळ्यात ग्रामस्थांना थंड पाणी मिळावे यासाठी त्यांच्या पाण्याच्या प्लांटमधून दोन दिवस मोफत पाणी उपलब्ध करून देण्यात आले. मुलाच्या वाढदिवसानिमित्त राबवलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. अमोल पाटील, डॉ. राहुल पाटील, उपसरपंच दिगंबर राजमाने, शशिकांत कस्तुरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल गेंगाणे, महासिद्ध वाले, दयानंद तारके, तंटामुक्त समिती अध्यक्ष दत्तात्रय भिमदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

