ढेबेवाडी जंगल वाचविण्यासाठी सरसावले गावकरी
जंगल वाचविण्यासाठी निवी ग्रामस्थ सरसावले
जाळपट्टा काढण्यासाठी वनविभागाला साथ; वणवे रोखण्यासाठी पुढाकार
ढेबेवाडी, ता. २४ : विभागात वणव्याचे प्रमाण वाढल्याने मालकी क्षेत्रातील वणवा वनक्षेत्रात घुसू नये, यासाठी निवी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी जंगलाभोवती सुमारे तीन किलोमीटरचा जाळपट्टा काढला. सुमारे पाच तास सुरू असलेल्या या मोहिमेत ग्रामस्थ व वनकर्मचारी सहभागी झाले होते.
ढेबेवाडी विभागाला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. प्रादेशिक व वन्यजीव अशी येथील वनक्षेत्राची विभागणी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या संपदेला वणव्याचे ग्रहण लागले आहे. जंगलांना लागूनच असलेल्या मालकी क्षेत्रातून वणव्याचा भडका उडत असल्याने क्षणात होत्याचे नव्हते होऊन मोठी हानी होत आहे. वनांचे महत्त्व समजल्याने जंगलालगतच्या गावात अलीकडे वणव्यांबाबत जागरूकता निर्माण झालेली दिसते. प्रतिवर्षी वनविभागामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या जाळपट्टा काढण्याच्या मोहिमेत काही ठिकाणी लोकसहभाग लाभत आहे. सांगली व सातारा जिल्ह्याच्या सीमेलगतच्या जंगलाचा शेजार असलेल्या निवी गावच्या ग्रामस्थांनी नुकताच तीन किलोमीटरचा जाळपट्टा काढून वनसंपदा वणव्यांपासून सुरक्षित केली. सुमारे १२ फूट रुंद आणि तीन किलोमीटर लांबीचा जाळपट्टा तयार करण्यासाठी ग्रामस्थ सकाळी घराबाहेर पडले. पाच तास त्यांनी श्रमदान केले. वनक्षेत्रपाल राजेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शशिकांत नागरगोजे, वनरक्षक शरद टाले, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मारुती ऊर्फ बाळू पाटील, रामचंद्र साबळे, अंकुश पवार, पांडुरंग पाटील, अधिक पाटील, रघुनाथ साबळे, रोहित साबळे आदी ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. वनकर्मचाऱ्यांनी ब्लोर मशिनचा, तर ग्रामस्थांनी झाडांच्या डहाळ्याचा वापर करून जाळपट्टे काढले.
----
B08147
निवी : वनक्षेत्रात वणवा घुसू नये, यासाठी वनकर्मचाऱ्यांसमवेत जाळपट्टा काढताना ग्रामस्थ.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

