esakal | पुणे : कोंढापुरीत पर्यावरणासाठी झटताहेत ग्रामस्थ
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : कोंढापुरीत पर्यावरणासाठी झटताहेत ग्रामस्थ

- लॉकडाऊनमध्ये निसर्गरम्य धबधब्याचे रूप ग्रामस्थांना आकर्षक करतेय

पुणे : कोंढापुरीत पर्यावरणासाठी झटताहेत ग्रामस्थ

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील मल्हार गडावरील शासकीय तलावातील जादा झालेले पाणी सांडव्याद्वारे पुन्हा ओढ्यात खळखळत वाहत असून, लॉकडाऊनमध्ये हे निसर्गरम्य धबधब्याचे रूप ग्रामस्थांना आकर्षक दिसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

पुणे- नगर रस्त्यालगत कोंढापुरी गाव असून, गावच्या पूर्वेला उंच डोंगरावर मल्हार गड व वनराई बहरली आहे. येथेे प्रसिद्ध खंडोबाचे आकर्षक मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला शासकीय तलाव असून, त्याचा विस्तार शिरूर तालुक्यात मोठा आहे. याच तलावातील पाण्यावर कोंढापुरी, रांजणगाव गणपती, खंडाळे, पिंपरी दुमाला, वाघाळे, गणेगाव, निमगाव म्हाळुंगी आदी गावे अवलंबून आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोंढापुरी ग्रामस्थांनी मल्हार गडावरील निसर्गाचा पूर्ण उपयोग करण्याचे ठरविले असून, येथील ग्राम विकास फौंडेशनने लोकवर्गणीतून गावातील विविध परिसरात बंधारे बांधून गाव जलयुक्त केले आहे. तशेच मल्हारगडावरील वनराई परिसरात सुमारे ११०० झाडे लावून त्याचे संगोपन केले आहे. यातील सुमारे ३०० झाडांना लोकवर्गणीतून उंच व आकर्षक जाळ्या बसविल्या असून, ज्यांनी जाळी दिली आहे त्याचे नाव त्यावर टाकले आहे. तसेच बहुतांश झाडांना पक्षांसाठी धान्य व पाण्याची सुविधा केली आहे.मूठभर धान्य पक्षासाठी ही संकल्पना राबविली आहे. झाडांना पाण्यासाठी ठिबक सिचन केले आहे. सर्व ग्रामस्थ गावातील पर्यावरणाचे संवर्धन वर्गणी व स्वयंस्फूर्तीने करतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोंढापुरी गावाचा वैभवशाली ठेवा, निसर्गाची भरभरून उधळण...मल्हार गडावर फुललेली वनराई व त्यात विविध पक्ष्यांचा किलबिलाट, गावच्या परिसरात पाण्याने भरलेले विविध बंधारे, खळखळणारा धबधबा असं हे निसर्ग दृस्य पाहून ग्रामस्थ अक्षरशः भारावून गेले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच हे गाव पुणे- नगर रस्त्यालगत असल्याने वाहनचालक व प्रवाशी  येथील निसर्ग दृश्य आनंदाने पाहतात. निसर्गाचा अमोल ठेवा व त्यात ग्रामस्थांनी टाकलेली भर असं हे समाधानकारक दृश्य सर्वांनाच आपलेसे वाटत आहे. कोंढापुरी गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. 

loading image