अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू;कारी ग्रामस्थांनी मानवाप्रमाणे केले विधिवत अंत्यसंस्कार

अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू;कारी ग्रामस्थांनी मानवाप्रमाणे केले विधिवत अंत्यसंस्कार
Published on

वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू
कारी ग्रामस्थांनी मानवाप्रमाणे केले अंत्यसंस्कार

पांगरी, ता. १६ : प्राण्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि माणुसकीचा प्रत्यय देणारी घटना पांगरी-अंबेजवळगे रस्त्यावर बुधवारी (ता. १६) सकाळी घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वानराचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या मुक्या जिवाला वाऱ्यावर न सोडता कारी (ता. बार्शी) येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत त्याच्यावर धार्मिक विधी करून अंत्यसंस्कार केले.
पांगरी-अंबेजवळगे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर वानरांचा कळप नेहमीप्रमाणे बागडत होता. बुधवारी सकाळी कळपातील एक वानर रस्त्यावर आले असता भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात वानराचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कारी येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. वन विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली. मृत वानराची अवस्था पाहून ग्रामस्थ भावुक झाले. केवळ एक प्राणी म्हणून त्याच्याकडे न पाहता, आपल्यातीलच एक जीव गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था केली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर धार्मिक विधी पार पाडत वानराच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जड अंतःकरणाने ग्रामस्थांनी या मुक्या जिवाला अखेरचा निरोप दिला.

कोट...
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि प्राण्यांप्रतीचे प्रेम खरोखरच मनाला स्पर्श करणारे आहे.
- ज्ञानेश्वर अपुणे, वनमजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com