Video : आजींची कलाकुसर लई भारी!

नीला शर्मा
बुधवार, 8 एप्रिल 2020

ब्याऐंशी वर्षांच्या विमल माधव बापट या आज्जी मोती, लोकर व धाग्यांपासून उत्तम कलाकृती तयार करतात. चविष्ट लोणची व रव्याचे लाडू बनविण्यासाठी त्यांची नातेवाइकांमध्ये ख्याती आहे. त्यांनी केलेल्या क्रोशाच्या राजहंसाबरोबरच मोत्यांच्या की-चेन्स अनेक परिचितांना मिरवाव्याशा वाटतात. 

बाहेर कुठंही लोकर, मोती वगैरेची एखादी वेगळ्या तऱ्हेने केलेली वस्तू पाहिली की, घरी लगेच तसं करून बघायचा छंद विमल यांनी जपला आहे.  त्या म्हणाल्या, ‘‘घरातले सगळे आपापल्या कामांसाठी बाहेर असतात. मला माझ्या या छंदामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही. क्रोशाचे टेबलक्‍लॉथ, रुमाल वगैरे तर भरपूर करतेच, पण क्रोशाचा राजहंस करणं मला फार आवडतं. एखादं खेळणं असावं, तसा हा शुभ्र राजहंस. याच्या पोटात नारळ ठेवून, ओटी भरताना तो अनेक लेकी-सुनांना दिला. तो पाहताच त्यांचे चेहरे खुलतात, तोच माझा आनंद. माझी सून प्रज्ञा पॉन्डमध्ये फुलं ठेवते. तिथं ठेवायला सध्या मी राजहंस करते आहे.’’

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रज्ञाताई म्हणाल्या, ‘‘आमच्या आईंना एकदा काही पाहून ते स्वतः करताना एवढं सगळं लक्षात राहतं, हे मोठं वरदान आहे. रांगोळी वाटावी, अशा रचनाही त्या मोत्यांपासून तयार करतात. क्रोशा आणि लोकरीच्या विणकामातूनही त्या वस्तू बनवतात.’’ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vimal bapat art

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: