

Growing Hooliganism in MHADA Colony Wadgaon Sheri
sakal
वडगावशेरी : विमाननगर येथील म्हाडा कॉलनीतील चौका चौकात उभे राहून अश्लील भाषेत शेरेबाजी, शिवीगाळ आणि गुंडगिरी करणाऱ्या टवाळखोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचा काडीचाही वचक राहिला नसल्यामुळे गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच भविष्यातही येथे गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे.