विमाननगर, सोमनाथनगर भागात चोरांचा धुमाकूळ; ९ दुकाने फोडली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

विमाननगर व सोमनाथनगर भागात चोरटयांनी एका रात्री नऊ दुकाने फोडल्याची घटना घडल्याने परिसरात चोरट्यांचा धुमाकळ वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाकेच्या अंतरावर विमानतळ पोलिस स्टेशन तसेच सोमनाथनगर येथील महात्मा फुले पोलिस चौकी
आहे.

रामवाडी (पुणे) : विमाननगर व सोमनाथनगर भागात चोरटयांनी एका रात्री नऊ दुकाने फोडल्याची घटना घडल्याने परिसरात चोरट्यांचा धुमाकळ वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाकेच्या अंतरावर विमानतळ पोलिस स्टेशन तसेच सोमनाथनगर येथील महात्मा फुले पोलिस चौकी
आहे.

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

बुधवारी रात्री मुसळधार पाऊस पडत होता. रस्ते जलमय झाले होते. काही सोसायटया व बैठ्या घरात पाणी शिरल्याने परिसरातील विद्युत विभागाकडून विद्युत प्रवाह बंद ठेवण्यात आला होता. या सर्व परिस्थितीचा फायदा चोरांनी उचला. विमाननगरच्या मुख्य चौकात चार दुकाने फोडुन एकुण 48  हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे  विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत गिरी यांनी सांगितले.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमनाथनगर वडगावशेरी भागात त्याच रात्री पाच दुकान फोडण्यात आली. परंतु, दुकानातुन किरकोळ रक्कम गेल्याने पोलिस चौकीत  तक्रार केली नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. एकाच रात्री अनेक दुकाने चोरट्यांकडून फोडण्यात आल्याने परिसरात नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके म्हणाले, ज्या ठिकाणी चोरटयांनी दुकाने फोडली याची माहिती मिळताच मी प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. पण दुकानदाराकडून पोलिस चौकीत तक्रार केली नसल्याने अद्याप गुन्हा दाखल झालेला  नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vimannagar-Somnathnagar area burglary; 9 shops were blown up