esakal | विमानतळ पोलीस ठाण्याचे नव्या जागी; आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

vimantal police

विमानतळ पोलिस ठाणे आता नव्या वास्तूत स्थलांतरित झालं आहे. या नव्या इमारतीचं उद्घाटन पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. 

विमानतळ पोलीस ठाण्याचे नव्या जागी; आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वडगाव शेरी - विमानतळ पोलिस ठाणे आता नव्या वास्तूत स्थलांतरित झालं आहे. या नव्या इमारतीचं उद्घाटन पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन समारंभाला पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह सहपोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  या कार्यक्रमाला अशोक मोराळे, नामदेव चव्हाण, डॉक्टर संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, परिसरातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते. 

विमानतळ पोलीस स्टेशन पूर्वी रामवाडी येथे पुणे महानगरपालिकेच्या जागेत पहिल्या मजल्यावर कार्यरत होते. येथे पोलीस कर्मचाऱ्यांना आणि येणाऱ्या नागरिकांना जागा अपुरी पडत होती. तसेच गैरसोय होत होती. ते आता नागरिकांच्या सोईसाठी विमान नगर च्या मध्यवर्ती भागात खालसा डेअरीच्या मागे स्थलांतरित करण्यात आले आहे. नवी इमारत सुमारे दोन हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात आली असून इमारतीसमोर पुरेसे पार्किंग उपलब्ध आहे. जागेवर पूर्वी असलेली विमाननगर पोलीस चौकी फिनिक्स मॉल शेजारील जागेत स्थलांतरित करण्यात आली आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, आज उद्घाटन केलेली इमारत चांगली आहे परंतु पोलीस स्टेशन येथे कायम राहणार नाही. नगर रस्त्यावर राखीव जागेवर विमानतळ पोलिस स्टेशनची अत्याधुनिक इमारत बनवली जाईल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक देव यांनी केले.

loading image
go to top