

PNE26W64008 सोलापूर ः विनायक लॉजच्या मागच्या रस्त्यावर पसरलेला कचरा.
विनायक लॉजमागील रस्ता म्हणजे कचराकुंडी
मद्यपींमुळे नागरिकांमध्ये धास्ती; महापालिका, पोलिस प्रशासनाचेही दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ४ : शहरातील सार्वजनिक रस्ते नागरिकांच्या वापरासाठी आहेत की कचरा टाकण्यासाठी आणि लघुशंकेसाठी, असा प्रश्न विनायक लॉजमागील रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. या रस्त्यावर साचलेला कचरा, पसरलेली घाण आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हा प्रकार असतानाच नजीकच्या अड्ड्यावरून बाहेर पडणाऱ्या मद्यपींचा दिवसभर वावर असल्याने नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना धास्ती वाटत आहे. परिस्थिती इतकी त्रासदायक झाली आहे की, नागरिकांनी या रस्त्याचा वापरच टाळण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊनही महापालिका व पोलीस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये नाराजी आहे. दिवसभर मद्यपींचा वावर असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पादचाऱ्यांना या मार्गावरून जाताना असुरक्षित वाटते. त्यामुळे सोयीचा असूनही नागरिक या रस्त्याने जाणे टाळत आहेत.
-------------------------------------------
प्रशासनाने जबाबदारी झटकू नये!
केवळ तात्पुरती साफसफाई करून हा प्रश्न सुटणार नाही. महापालिका आयुक्तांनी या परिसराची पाहणी करून नियमित स्वच्छता, कचरा उचलण्याची व्यवस्था आणि अस्वच्छता रोखण्यासाठी ठोस उपाय करावेत. पोलिस प्रशासनानेही मद्यपींच्या वावरावर लक्ष ठेवून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.