
निम्हण कुटुंबाला महिनाभरातच दुसरा धक्का! विनायक निम्हण यांच्या मातोश्रींचे निधन
पुणे : पुण्यातील शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आता त्यांच्या मातोश्री सावित्री महादेव निम्हण यांचेही आज निधन झाले, विनायक निम्हण यांच्या निधनाच्या २० दिवसांच्या आतच निम्हण कुटुंबाला आज शनिवारी (ता. १९) दुसरा धक्का बसला आहे. (Vinayak Nimhan news in Marathi)
२६ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातच विनायक निम्हण यांचे निधन हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. विनायक निम्हण यांच्या निधनामुळे ऐन दिवाळीसणात निम्हण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज त्यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे निम्हण कुंटुंबियांवर दुहेरी आघात झाला आहे.
हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....
निम्हण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा, तर काँग्रेसकडून एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. ते सध्या शिवसेनेत होते. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.