विनोद भोसले यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार

विनोद भोसले यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार
Published on

AKJ26B01553
पुणे ः महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार स्वीकारताना आरोग्यदूत विनोद भोसले.

आरोग्यदूत विनोद भोसले यांना महाराष्ट्ररत्‍न पुरस्कार

लवंग, ता. १० ः समाजकार्य, जनसेवा तसेच वैद्यकीय मदत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत लवंग येथील आरोग्यदूत विनोद भोसले यांना पुणे येथे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य व नालंदा विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मराठी चित्रपट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन ढवणे पाटील, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. नीता जोशी आणि कॅलेंट कट्टा संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक दादाराव जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विनोद भोसले यांना समाजकार्य, जनसेवा आणि वैद्यकीय मदत क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून भोसले सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. अपघातग्रस्त रुग्णांना व गरजू रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया तसेच आर्थिक साहाय्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
पुरस्कार स्वीकारताना विनोद भोसले यांनी हा सन्मान दिवंगत अजित पवार यांच्या विचारांना समर्पित करत हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून माझ्यासोबत रुग्णसेवेत झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि प्रत्येक गरजू रुग्णाचा आहे. अशी भावना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com