चाकण - खेड तालुक्याच्या पूर्व भागातील एसई झेड मधील विविध कंपन्यात ठेकेदारी मिळवण्यावरून हाणामाऱ्या, वादविवाद संघर्ष होत आहेत. यात यापूर्वी काही जणांचे खूनही झाले आहेत. ह्युंदाई कंपनीतील कामाचा ठेका घेण्यावरून स्थानिक गावातील दोन गटांमध्ये कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार हाणामारी झाली.
या प्रकरणी राजगुरूनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. असे प्रकार खेड एसईझेड व चाकण औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यात वाढत आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील गुन्हेगारी वाढत आहे का? असा सवाल नागरिक,उद्योजक, कामगार निर्माण करत आहेत.
राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात उद्योग धंद्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांचे जाळे या परिसरात आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औद्योगिक वसाहतीत गुंडगिरी खपवून घेणार नाही असा कडक इशारा दिला होता.
त्यानंतरही एईझेड, औद्योगिक वसाहतीत गुंडांची दहशत आहे. खेडच्या पुर्व भागातील एसईझेड मधील ह्युंदाई कंपनीच्या प्रवेश द्वारावर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये काहींना मारहाण झाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी -चिंचवड मधील कार्यक्रमानंतर खेड एसई झेड व चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी येथे काही घटना घडल्या. ह्युंदाई कंपनीत कंत्राट मिळवण्यासाठी स्थानिक गावातील दोन गटांमध्ये कंपनीच्या प्रवेश द्वारावर हाणामारी झाली.
काठ्या, लोखंडी गज अगदी प्रवेश द्वारा वरील सुरक्षेच्या वस्तूंनी मारहाण करण्यात आली. ह्युंदाई कंपनीच्या प्रवेश द्वारावर झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी गटातील तरुणावर गुन्हे ही दाखल झाले आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुंडाचा त्रास वाढतोय....
चाकण औद्योगिक वसाहत, खेड एसईझेड मध्ये स्थानिक गावातील काही गुंडांचा कंपनीतील ठेके मिळविण्यासाठी उद्योजकांना, कंपनी व्यवस्थापनाला त्रास वाढतो आहे असे चित्र आहे. या त्रासाने कंपनी व्यवस्थापन, कंपनी प्रतिनिधी, उद्योजकांमध्ये तसेच कामगारात ही भीती निर्माण होत आहे.
या गुंडांच्या दादागिरीचा बंदोबस्त करण्याची मागणी काही उद्योजक, काही संघटनांकडून केली जात आहे. या गुंडांना काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त तसेच आशीर्वाद आहे असे बोलले जाते. त्यांच्यामुळे गुंड मस्त वाल झाले आहेत व ते कंपन्यात ठेका मिळविण्यासाठी दादागिरी, भाईगिरी करत आहेत हे वास्तव आहे.
अगदी कंपनीच्या प्रवेशद्वारावर दिवसा ढवळ्या हाणामाऱ्या करत आहेत हे भयानक आहे. सोशल मीडियावर हे व्हायरल होणारे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची भयानकता जाणवते. या गुंडाच्या आकांना ही पोलिसांनी दणका देण्याची गरज आहे. या आकांचे आका 'पोलिसांनी शोधले की गुन्हेगारी कमी होईल असाही अंदाज उद्योजक, काही कंपनी व्यवस्थापक, प्रतिनिधी यांचा आहे.
याबाबत राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले की, 'ही घटना मागील फेब्रुवारी महिन्यात घडली होती. ह्युंदाई कंपनीतील कामाचा ठेका मिळविण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर दोन गटात हाणामारी झाली होती.
याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी आहेत.दोन्ही गटातील तरुणावर गुन्हे दाखल केलेले आहेत. यामध्ये चौघाना अटक करण्यात आली होती. दोन्ही गटातील तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.