
उरुळी कांचन : गायरान जागेवरून जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना कोरेगावमूळ परिसरातील मोरे वस्ती येथे रविवारी (ता. २७) दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी २३ वर्षीय महिलेने आणि स्वप्नील पांडुरंग मोरे (वय २७, रा. कोरेगावमूळ, मोरे वस्ती, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्याद दिली आहे.