Pune Crime : कोंढव्यात किरकोळ वादातून १७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघांना अटक
Kondhwa police station crime report : कोंढव्यात किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. चार जणांनी १७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
पुणे : कोंढवा परिसरात किरकोळ वादातून १७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.