विप्लवला छंद नावीन्यपूर्ण इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा 

विप्लवला छंद नावीन्यपूर्ण इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा 

विप्लव मालपुटे हा आठवीत गेलेला मुलगा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्यात तासन्‌तास रमतो. सायकलसाठीचा इंडिकेटर, वायरलेस नोटिसबोर्ड, मोबाईल फोन व ब्ल्यू टूथच्या माध्यमातून साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादसुविधा अशी अनेक उपयुक्त साधनं त्याने बनवली आहेत. 

विप्लव विकास मालपुटे याला इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बनवण्याचा भारीच छंद. तो तासन्‌तास त्यात रमतो. जुन्या, वापरात नसलेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स साधनांमधील अजूनही वापरता येतील, अशा सुट्या भागांचा फेरवापर करून तो वेगळंच काही तरी बनवतो. तो म्हणाला, ""मी एक वायरलेस नोटिसबोर्ड तयार केला आहे. याच्या डिस्प्लेवर दोन ओळींमध्ये सोळा अंक किंवा अक्षरं बसू शकतात. यात कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या साहाय्याने प्रोग्रॅमिंग करून संदेश प्रसारित करता येतो. हा संदेश वाचता येतो तसाच तो ऐकवण्याची सोयही आहे. असंच ब्लू टूथ तंत्राच्या वापराने संदेश वहनाचं साधन तयार केलं आहे. सायकलसाठीचा इंडिकेटर बनवला आहे. याच्या माध्यमातून ब्रेक दाबल्यावर मागच्या बाजूला लाल रंगाची पट्टी प्रकाशाने उजळून निघते. डावी-उजवीकडे आपण वळणार असल्याचा संकेत देण्याची व्यवस्थाही मी केली आहे. सोल्डरिंग गन ठेवण्यासाठी लाकडी स्टॅण्ड मी टाकाऊ वस्तूंपासून बनवला आहे.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विप्लवची आई वंदना यांनी सांगितलं की, विप्लवला एखादी वस्तू तयार करायची कल्पना सुचल्यानंतर तो ती पूर्णत्वाला जाईपर्यंत खूप कष्ट घेतो. धीराने पाठपुरावा करतो. त्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या संकेतस्थळांचा शोध घेऊन त्यात सांगितलेल्या गोष्टींवर स्वतः विचार करतो. आपल्या कामात वेगळेपणा कसा आणता येईल, याकडे त्याचं लक्ष असतं. त्याच्या कल्पक वृत्तीला या छंदामुळे नवी वाट खुली झाली आहे. कल्पनेला तर्काची जोड मिळाली आहे. विप्लवची क्षमता धावणे, सायकल चालवणे या फिटनेस प्रकारांमध्येही उत्तम आहे. शारीरिक व बौद्धिक संपदेची तो मेहनतीने करत असलेली कमाई पाहताना विलक्षण समाधान आणि अभिमान वाटतो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com