Pune : दलाई लामांकडून बारामतीच्या विपुल शहा याचा सन्मान

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे येता काळ आणखी बिकट असून समस्त मानवजातीने एकजूट होण्याची ही वेळ आहे
Pune : दलाई लामांकडून बारामतीच्या विपुल शहा याचा सन्मान
Summary

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे येता काळ आणखी बिकट असून समस्त मानवजातीने एकजूट होण्याची ही वेळ आहे

बारामती : जागतिक कीर्तीचे तिबेटी बौध्द धर्मगुरू व नोबेल शांतता पारितोषिक विजेते दलाई लामा यांच्या हस्ते बारामतीच्या विपुल शहा यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

धरमशाला येथे दलाई लामांच्या निवास्थानी झालेल्या दोन दिवसीय कमपॅशिनेट लीडरशीप समिट मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी विपुल यांना मिळाली. शांतता, करुणा व युवा नेतृत्व याविषयावर दलाई लामांशी संवाद साधण्यासाठी जगभरातून 15 युवकांची निवड अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठाद्वारे (युनिव्हर्सीटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन) करण्यात आली होती.

गेली दोन वर्षे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी व मार्गदर्शन मिळाले. या चर्चासत्राचे नेतृत्व जगविख्यात मनोबुद्धी वैज्ञानिक रिचर्ड डेव्हिडसन तसेच जागतिक कीर्तीचे लेखक डॅनियल व तारा गोलमन यांनी केले. विपुल शहा याचे उच्च शिक्षण अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून झाले आहे. शिक्षण तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे भारत व जगभरात त्याने केलेली कामगिरी पाहून या कार्यक्रमासाठी त्याची निवड करण्यात आली.

दलाई लामांशी संवाद साधताना गांधीजींसोबत स्वतंत्रलढ्यात काम केलेल्या आपल्या आजोबांची तसेच विपश्यना विद्या शिकविलेल्या पूज्य सत्यनारायण गोएंका गुरुजींची आठवण झाल्याचे विपुल शहा यांनी सांगितले. दलाई लामांनी आशीर्वाद दिला तो क्षण अविस्मरणीय होता असेही ते म्हणाले.

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे येता काळ आणखी बिकट असून समस्त मानवजातीने एकजूट होण्याची ही वेळ आहे. धर्म, राष्ट्र, भाषा यांतील भेद विसरून पृथ्वी आपल्या सर्वांचे एकमेव 'घर' आहे याची आठवण त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना करून दिली. युवकांशी एकूण चार तास हृदयस्पर्शी व मनमिळावू संवाद साधताना दलाई लामांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com