
वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण (Food), आसन व्यवस्था, वेगवेगळे पदार्थ आणि इंटेरीयर डिझाईनसाठी हॉटेल (Hotel) प्रसिद्ध असतात. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ची एका हॉटेलच्या मेनु कार्डची. पुण्यातील (Pune) सिंहगड परीसरात असणाऱ्या अशाच एका हॉटेल चालकाने आपल्या हॉटेलचं भन्नाट मेनु कार्ड तयार केलंय. हे मेनु कार्ड पाहील्यानंतर ही एखाद्या लग्नाची पत्रिका आहे की, मेनु कार्ड आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल.
हॉटेल अतिथी बोरूळच्या मालकांनी आपल्या हॉटेलच्या मेनु कार्डला लग्न पत्रिकेचं स्वरूप दिलं आहे. यामध्ये त्यांनी थेट मटनला वर तर चिकनला वधू बनवल्याचं दिसतंय. संपुर्ण पत्रिकेत वेगवेगळ्या पदार्थांची नावं आयोजक, कार्यवाहक, व्यवस्थाक मंडळीमध्ये देण्यात आली आहे.
या भन्नाट मेनु कार्ड सोबतच हॉटेलचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या हॉटेलमधल्या गरमागरम भाकरी आणि चिकणची चव सुद्धा तेवढीच भारी आहे. त्यामुळे यापरिसरातील नॉन व्हेज आवडणाऱ्या खवय्यांची इथे मोठी गर्दी झालेली असते.
"आयुष्यातील आर्थिक अडचणींमुळे एका छोट्याशा गावातून मी पुण्यासारख्या एका मोठ्या शहरात येऊन एक यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक म्हणून पुढे येण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. पुणे शहरात हॉटेल बोरूळ अतिथीच्या रुपानं उद्योजकतेमध्ये मराठी माणसाला सन्मान मिळावा या ध्यासापोटी व्यवसायिक म्हणून एक ओळख निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि आपला उद्योग वाढवण्यासाठी अशा युक्त्या लढवत असतानाच आपल्या आईने ही युक्ती दिली असं" युवा उद्योजक आणि हॉटेलचे मालक असलेले सत्यम बोरूळ सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.