esakal | पावसामुळे कोरोना धुऊन जातोची ‘व्हायरल’ चर्चा; तज्ञ काय सांगतात?
sakal

बोलून बातमी शोधा

Rain and cloud might actually help prevent the spread of coronavirus

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई-पुण्यात पडत असलेल्या जोरदार पावसात आता कोरोना धुऊन जाणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या फैलावाप्रमाणेच ही चर्चाही गुणाकार पद्धतीने लोकांपर्यंत पोचत असल्याचे दिसून येते. पण, प्रत्यक्षात असं काहीही होत नसल्याचं ठाम उत्तर साथरोग तज्ज्ञ देतात.

पावसामुळे कोरोना धुऊन जातोची ‘व्हायरल’ चर्चा; तज्ञ काय सांगतात?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई-पुण्यात पडत असलेल्या जोरदार पावसात आता कोरोना धुऊन जाणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या फैलावाप्रमाणेच ही चर्चाही गुणाकार पद्धतीने लोकांपर्यंत पोचत असल्याचे दिसून येते. पण, प्रत्यक्षात असं काहीही होत नसल्याचं ठाम उत्तर साथरोग तज्ज्ञ देतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अरबी समुद्रात मंगळवारी (ता. 2) दुपारी पावणे दोन वाजता चर्कीवादळ तयार झाले. रात्री उशिरा या चक्रिवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले. त्यामुळे काल संध्याकाळपासूनच पुण्या-मुंबईत जोरदार पावसाच्या सरी पडल्या. पुण्यात काल रात्री साडेआठ वाजेपर्यंत 38 मिलीमीटर तर, बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे या दोन शहरांमध्ये उद्रेक झालेला कोरोना विषाणू धाऊन जात आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या या वादळी पावसामुळे कमी होईल. किंबहुना विषाणूंचा हा उद्रेक कमी करण्यासाठीच पाऊस आला इथपर्यंत या चर्चेला उधाण आल्याचं दिसतं. 
---------
भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
---------
तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव; पडद्यामागे चीन चाललंय काय?
---------
पण, पुण्यातील चाळीस अंश सेल्सिअसमध्ये कोरोना वेगाने वाढल्याचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. पूर्वमोसमी पावसातही याचा फैलाव कमी झाल्याचे दिसले नाही. हवामानातील बदलाचा या विषाणूंवर नेमका कसा आणि कधी परिणाम होतो, याचा कोणताही अभ्यास आतापर्यंत झालेला नाही. पावसामुळे कोरोना धुऊन जातो, याचा कसलाच शास्त्रिय आधार नसल्याचे साथरोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

या बाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “कोरोना हा थुंकीतून पसरणारा विषाणू आहे. याचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला हा होण्याचा धोका जास्त असतो. त्यावर पावसाचा किंवा वादळी वाऱयाचा परिणाम होताना दिसत नाही. हा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टसिंग काटेकोरपणे पाळणे, हेच तीन प्रभावी मार्ग आहेत. त्यामुळे पावसामुळे कोरोना धुऊन जातो, या व्हायरलवर विश्वास ठेऊ नका.

loading image
go to top