अल्पवयीन मुलीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारा आरोपी परराज्यातून अटक
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास अटक
वैराग : बार्शी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या धमक्या व मानसिक छळाला कंटाळून पीडितेने वैराग पोलिसांत तक्रार दिल्याने आरोपीस परराज्यातून अटक केली. त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
डिसेंबर २०२४ पासून परराज्यातील उच्च शिक्षण घेत असलेल्या आरोपीची पीडितेसोबत सोशल मीडियावरून मैत्री झाली. त्यानंतर पीडितेला मानसिक त्रास देत होता. त्याने पिडीतेचे फोटो व व्हिडिओ काढले होते. तिच्या कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी तसेच आई-वडिलांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत दबाव टाकत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततच्या धमक्या व मानसिक छळाला कंटाळून पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर परराज्यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

