विरवडे बुद्रुक गावाला आयुर्विमा महामंडळाकडून एक लाख रुपयाचा निधी

विरवडे बुद्रुक गावाला आयुर्विमा महामंडळाकडून एक लाख रुपयाचा निधी

Published on

KMT26B00936
कोरवली (ता. मोहोळ) : विमा ग्राम योजनेतून एक लाखाचा निधी स्वीकारताना विरवडे बुद्रूक गावचे सरपंच सचिन पाटील, प्रकाश अवताडे, मुकुंद अवताडे, नरसिंह पाटील आदी.
---
विरवडे बुद्रूक गावाला एक लाखाचा निधी
कोरवली : गावाच्या विकासासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षात विरवडे बुद्रूक (ता. मोहोळ) गावाने पंधरा लाखांचा प्रिमियम व ५० विमाधारक पूर्ण केल्याबद्दल गावाला विमा ग्राम योजनेतून एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. ग्रामस्थांच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने हा निधी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवे दालन खुले झाले आहे. प्रारंभी हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे वरिष्ठ शाखा अधिकारी कृष्णा माळी, उपशाखा अधिकारी गणेश बेलसरे, विकास अधिकारी खंडेश बोगरगे, श्रीकृष्ण उद्योग समूहाचे चेअरमन प्रा. प्रमोद अवताडे, विमा प्रतिनिधी समाधान आवताडे, गोपाळ पाटील उपस्थित होते. मंचावर सरपंच सचिन पाटील, प्रकाश अवताडे, मुकुंद अवताडे, प्रमोद अवताडे, नरसिंह पाटील, लहू अवताडे आदी उपस्थित होते. सचिन मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com