केळघर साहित्य वाटप
विशाल कुमठेंतर्फे शालोपयोगी वस्तूंचे वाटप
केळघर, ता. १ : ब्लॅक ड्रॅगन स्पोर्टस् ॲकॅडमी महाराष्ट्र राज्य व वाई येथील जनजागृती विकास प्रबोधन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल कुमठे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग तीन दिवस वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला, तसेच वाई येथील नगरपालिका शाळा क्रमांक एक मुले, नगरपालिका शाळा क्रमांक दोन मुली, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भिलार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेटगुताड या सर्व शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. नगरपालिका शाळा क्रमांक एक वाईमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अक्षर इन्स्टिट्यूट स्कूल, साहिल अक्षर इन्स्टिट्यूट संचलित, पी. सी. अलवाणी स्कूल फॉर एम. आर. चिल्ड्रन, वाई यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. वाई गणपती घाटाजवळील झोपडपट्टीमधील सर्व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ज्योती गायकवाड, मृदुला गायकवाड, सानिका पोळ, रोहन देशपांडे, मयुरेश सूर्यवंशी, मयूर गाढवे, कैलास राऊत, मंजूषा गायकवाड, रिद्धी क्षीरसागर, विष्णू खोत, प्रेमजित चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.
01389
वाई : नगरपालिका शाळा क्र. एकमध्ये शालोपयोगी साहित्य वाटपप्रसंगी विशाल कुमठे व सहकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

