

Citizens demand action after a municipal contract worker was found interfering in the election process
Sakal
विश्रांतवाडी : येरवडा क्षेत्रीय कार्यालय निवडणूक अधिकारी कार्यालय परिसरात नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील पालिकेचा एक बिगारी कामगार निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ही बाब निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनात आणून देत शिवसेनेचे उमेदवार आनंद गोयल यांनी संबंधित कर्मचाऱ्याबद्दल लेखी तक्रार करून या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई होत नसेल तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.