श्री विश्वकर्मा जयंती रावेतमध्ये उत्साहात
रावेत, ता. ३ : पिंपरी चिंचवड श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रावेत येथे प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भक्तिगीते, अन्नदान, रास गरबा तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंकित व खुशबू वाजा, सागर व तेजल सुद्रा, तसेच अग्नीक व मीरा काटेलिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. लालजी चुडासमा, प्रवीण वाढीया, सुधीर वाजा, रमेश पडियाळ, प्रतीक सुद्रा, बाबू गोढानिया, जया वाढीया, भानू चुडासमा, वैशाली गोढानिया, भूमी सुद्रा, भारती वाढीया आणि हर्षा वाजा यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील वैश्य सुतार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमांना समाजबांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानत समाजातील ऐक्य, सेवा आणि संस्कृती जपण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल, असे नमूद केले. या जयंती उत्सवाचे नियोजन व संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

