वाई-नियम,शिस्तपालनामुळे,''ज्ञानदीप'' अग्रेसर: मकरंद पाटील
आर्थिक शिस्त पालनामुळे ‘ज्ञानदीप’ अग्रेसर
मकरंद पाटील; सोसायटीचे संस्थापक विश्वनाथ पवार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
वाई शहर, ता. २० : मुंबईत उपजीविकेसाठी नोकरी करतानाच तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन विश्वनाथ पवार यांनी शिस्त, नियमांचे पालन करीत ‘ज्ञानदीप’ला सहकारी बँकिंगमध्ये अग्रेसर केले, असे गौरवोद्गार मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी काढले.
ज्ञानदीप को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक विश्वनाथ पवार, शशिकला पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, अतुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘खंडाळ्यात सहकारी साखर कारखाना उभा राहण्यासाठी श्री. पवार यांनी चिकाटीने पाठपुरावा केला. ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हा कारखाना अनेक अडचणींवर मात करून गळीत हंगाम यशस्वी करीत आहे.’’
सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज म्हणाले, ‘‘श्री सेवागिरींचे भक्त असलेल्या पवार यांनी जनकल्याणाची इच्छा ठेवून सुरू केलेले कार्य यशस्वी झाल्याचे दिसते. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी वयाने वाढण्याबरोबरच पवार यांनी सहकार क्षेत्राच्या समृद्धीत वाढ केल्याने ती लोककल्याणकारी चळवळ बनल्याचे नमूद केले.’’
‘ज्ञानदीप’चे अध्यक्ष जिजाबा पवार म्हणाले, ‘‘श्री. पवार यांच्यामुळे मी सहकारात आलो. त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेचा कार्यविस्तार झाला. शिस्तीच्या कामकाजामुळे संस्था सक्षम बनली. संस्थेस राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.’’
शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष गोरख चव्हाण, पवार यांच्या आत्मचरित्राचे सहलेखक विलास वरे, मनोज पवार, श्री. थोरवे, प्रदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पवार यांच्या ‘प्रवास पंचेचाळीस पावलांचा’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. ज्ञानदीपचे उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब वांजळे, रवींद्र केंजळे, छाया शिंदे, बाळकृष्ण पवार, लक्ष्मण चव्हाण, हर्षल कदम यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास मंदाकिनी पोळ, दुष्यंत जगदाळे, विजय कासुर्डे, दुर्गा वाघ, निवृत्ती मस्के, हणमंत धिवार, संजय पवार, गजानन धुमाळ, गणपत पवार, जयसिंग भोसले, चंद्रकांत ढमाळ, लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.
---------------------------------------------
छायाचित्र :..............07604
सातारा : विश्वनाथ पवार यांचा सत्कार करताना मकरंद पाटील, चंद्रकांत ढमाळ, जिजाबा पवार, सुंदरगिरी महाराज, डॉ. यशवंत पाटणे, एकनाथ जगताप.
.............................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

