विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार समोर; कथीत आॅडीओ क्लिप व्हायरल

विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार समोर;   कथीत आॅडीओ क्लिप व्हायरल
Published on

विठ्ठल दर्शनासाठी पैसे;
ऑडिओ क्लिप व्हायरल

पंढरपूर, ता. १६ ः विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पंढरपुरातील स्थानिक दलाल आणि भाविकामध्ये दर्शनासाठीच्या आर्थिक व्यवहाराची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. या गंभीर प्रकाराची मंदिर समितीने दखल घेतली असून कायदे तज्ञांचा सल्ल्याने कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
उद्या पासून अधिक मास सुरू होत असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. अशातच वशिल्याच्या दर्शनासाठी प्रती व्यक्ती दोनशे रुपये या प्रमाणे पाच भाविकांसाठी येथील एका दलालाने फोन पे वर एक हजार रुपये घेतल्याची बाब यातून समोर आली आहे. वशिल्याने दर्शन देणारा दलाल आणि भाविकामध्ये पैसे घेऊन दर्शन देण्याबाबत झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान फोन पे वर पैसे पाठवण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरवरून पोलिस धागेदोरे शोधून काढतील अशी चर्चा आहे.
---
कोट
पैसे घेऊन वशिल्याने दर्शन देण्या संदर्भात स्थानिक एका व्यक्तीची आणि भाविकामध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडे देण्यात येणार आहे. शिवाय कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन संबंधित व्यक्ती विरोधात कडक करावाई करण्यात येणार आहे.
- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shivaji Era Stone Vessel Discovered at Pandharpur Vitthal Temple
Indian Spiritual Heritage Goes Global: Saint Statues Installed in Germany Temple
Mugdha Karnik Under Fire for Comments on Vitthal Devotees, Apology Sought
Devotees Throng Shri Vitthal Temple for Rare Darshan of Original Idol
Marathi News Esakal
www.esakal.com