मेढा: मालचौंडी एन एस एस शिबीर
विवेकवादामुळे जीवन प्रगल्भ अन् उन्नत
प्रा. निरंजन फरांदे; मालचौंडीतील शिबिरात व्याख्यान
मेढा, ता. १ : विवेकवाद ही संकल्पनाच मानवी जीवनाला अधिक प्रगल्भ आणि उन्नत करणारी आहे. विवेकवादामुळे माणूस निकोप आणि समतोल विचार करू लागतो. सहिष्णुता, दयाभाव, करुणा, माणसाचे दुःख जाणून घेण्याची क्षमता या सगळ्याचा विकास आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवतो, असे प्रतिपादन वक्ते व अभ्यासक प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.
जावळी तालुक्यातील मालचौंडी येथे रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात ‘विवेकवाद आणि तरुणाई’ या विषयावर ते बोलत होते. प्रा. डॉ. सविता मेनकुदळे अध्यक्षस्थानी होत्या. मालचौंडीचे सरपंच संपत रवले, जावळी मित्रमेळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार, एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. नवनाथ इप्पर, प्रा. डॉ. विद्या नावडकर, प्रा. डॉ. महादेव चिंदे आदी उपस्थित होते.
प्रा. फरांदे म्हणाले, ‘‘विवेकाने जगणे हा भेकडपणा नव्हे, तर ते एक धाडस आहे. जेव्हा विवेकवादी समाज निर्माण होईल तेव्हा, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाची दारे खुली होतील.’’
प्रा. डॉ. मेनकुदळे म्हणाल्या, ‘‘आज समाजात विवेकवादी वर्तनाची अनन्यसाधारण आवश्यकता निर्माण झाली आहे. नैतिकता, सामाजिक भान, राष्ट्रीय एकात्मता या सर्वच मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी विवेकवाद आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण यासाठीच श्रमसंस्कार शिबिरे आयोजित करत असतो. यामुळे गाव खेड्यातील जनजीवनाची जाणीव आपल्याला होते. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण झाल्यामुळे समाजाविषयी अधिकचे जागरूकता निर्माण होते.’’
B01087
मालचौंडी : व्याख्यानात बोलताना प्रा. निरंजन फरांदे. त्या वेळी मान्यवर.
.................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

