श्री संत दामाजी महाविद्यालच्या वतीने भालेवाडीत मतदार जनजागृती

श्री संत दामाजी महाविद्यालच्या वतीने भालेवाडीत मतदार जनजागृती

Published on

MGV26B15196
मंगळवेढा : श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या वतीने भालेवाडीत मतदार जनजागृती फेरी काढून प्रबोधन करताना रासेयोचे विद्यार्थी.
---
दामाजी महाविद्यालतर्फे मतदार जनजागृती
मंगळवेढा : येथील श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या रासेयोच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भालेवाडी गावात मतदार जनजागृती फेरी काढून प्रबोधन करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावातून फेरी काढून ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘आपले मत पवित्र मत’, ‘चला रे चला मतदानाला चला’ असा जागर करण्यात आला. यावेळी संविधानाने दिलेला हक्क आपण चांगल्या पद्धतीने बजावला पाहिजे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा, अशा आशयाचे फलक आकर्षित करीत होते. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी, असे आवाहनही केले. यावेळी प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड, सरपंच डॉ. श्रीकांत दवले, प्रकल्प अधिकारी डॉ. राजाराम पवार, डॉ. सुधाकर राठोड, डॉ. जावेद तांबोळी, संगाप्पा पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थ, प्राध्यापक, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com