Voter Awareness
sakal
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर–घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या स्वीप (SVEEP) कक्षाअंतर्गत प्रभाग क्रमांक 7 व 12 मध्ये सोमवारी ( दि.12 जानेवारी) मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नागरिकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.