मतदान जनजागृती व हाळदी कुंकू कार्यक्रम

मतदान जनजागृती व हाळदी कुंकू कार्यक्रम

Published on

PDE26B04944
पांडे ः मतदार जागृती अभियानात सहभागी महिला.

पांडेत हळदी-कूंकू कार्यक्रमातून मतदार जागृती

पांडे, ता. २३ ः मतदार जनजागृती व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. करमाळा बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी व विस्तार अधिकारी संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती व हळदी कुंकू कार्यक्रम झाला.
पर्यवेक्षिका सुजाता कांबळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वरकुटे दोन व साडे या विभागातून हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मतदान जनजागृती विषयी रॅली काढण्यात आली. मतदार जनजागृती व आदिशक्ती योजनेविषयी महिलांना सुजाता कांबळे यांनी मार्गदर्शन केले. मतदानर जनजागृतीची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी विभाग वरकुटे दोन व विभाग साडे एक च्या सर्व सेविका, मदतनीस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी सेविका अश्विनी दुधे मंगल भानवसे, रंजना भोसले, गीता महामुनी व शालन लांडगे, ऋतुजा वीर, गौरी रासकर व नम्रता काकडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com