

voter list issue
sakal
पुणे - मतदान केंद्र तर सोडाच... परंतु राहण्यास एका प्रभागात, मतदान दुसऱ्या प्रभागात... लिंग, छायाचित्र, नावात बदल असे मतदारयादीतील ‘एक ना अनेक’ अजब अनुभव मतदारांना गुरुवारी आले. त्याचा फटका मतदानास बसला. अनेकांना मतदान न करताच परत जावे लागले. २०१४ नंतर दहा वर्षांनी पुन्हा एकदा मतदारयादीतील मोठा घोळ महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने गुरुवारी पहावयास मिळाला.