Voter List
sakal
पुणे - प्रारूप मतदारयादीत नावे एका प्रभागात, तर अंतिम मतदारयादीमध्ये प्रभाग बदलून दुसऱ्या प्रभागात जाणे, कुटुंबातील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर येणे, एकच नाव दोन-दोन प्रभागात (दुबार) असणे, अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. मतदान होणार असताना हे प्रकार समोर आल्याने मतदारराजाला मतदानाचा हक्क बजाविताना जागृतता दाखवावी लागणार आहे.