

नवी दिल्ली, ता.१५ (वृत्तसंस्था) ः केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी दिल्लीसह तीन राज्यांमध्ये सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीला मुदतवाढ देऊ केली आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, प्रारूप मतदारयादी आता ५ ऐवजी १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच, २९ जुलैपर्यंत नियोजित असलेली घरोघरी जाऊन केली जाणारी पडताळणी आठ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. पंजाबमध्येही बूथ पातळीवरील पडताळणी २४ जुलैऐवजी ३ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. राज्यात प्रारूप मतदारयादी ३१ जुलैऐवजी १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. अंतिम मतदारयादी १० ऐवजी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. तेलंगणमध्ये प्रारूप मतदारयादी १० ऑगस्ट रोजी, तर अंतिम यादी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल. कर्नाटकात घरोघरी पडताळणी २९ जुलैऐवजी ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. राज्यात प्रारूप मतदारयादी ५ ऐवजी १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. दक्षिणेकडील राज्यांत अंतिम मतदारयादी ७ ऐवजी १९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.