उद्याचा मंत्री म्हणून मतदारांनी टिळेकरांना कौल द्यावा : चंद्रकांत पाटील

chetan-tupe-hadpasar.jpg
chetan-tupe-hadpasar.jpg

मांजरी : ''आमदार योगेश टिळेकर कर्तृत्ववान, अभ्यासू, धडपडे आणि सर्वसामान्यांना वेळ देणारे आमदार आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढे सरकार चालवणाऱ्या शंभर जणांच्या यादीत त्यांचे नाव असून उद्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांना संधी आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पालकमंत्री पाटील बोलत होते.  नगरसेवक मारुती तुपे, संजय घुले, नगरसेविका उज्वला जंगले, जालिंदर कामठे, विकास रासकर, वंदना कोद्रे, शिवसेनेचे तानाजी लोणकर, समीर तुपे, विजय देशमुख, आरपीआयचे संतोष खरात, शशिकला वाघमारे, जितेंद्र भंडारी, शिवराज घुले, भूषण तुपे, रवि तुपे, विराज तुपे, नितीन होले, गणेश घुले, संदीप लोणकर, इतियाज मोमीन आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पालकमंत्री पाटील म्हणाले, "मतदाराला राजा म्हणणारी व देव मानणारी भाजपाची संस्कृती आहे. गेल्या पाच वर्षात भाजपा महायुतीने विकासकामाचा लेखाजोगा मतदारां पुढे स्पष्ट मांडला आहे. त्यामुळे महायुतीला यश आहे. पुण्याला २४ तास पाणी मिळेल, प्रशस्त आणि चांगले रस्ते, कचरा निर्मूलन, उड्डाणपूल, मेट्रो आणि ई-बससेवा ही कामे मार्गी लागत आहेत. मतदारांनी विरोधकाकडे पाठ फिरवली व विकास करणाऱ्या भाजप बरोबर जनता आली आहे. महिला बचत गटाला शुन्य टक्के अर्थसाह्य यातून ४० लाख महिला गट स्वावलंबी होता आहेत. सरकारच्या व टिळेकरांच्या या कामाची पावती म्हणून मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. पुढच्या काळात मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून आपल्या भागातील विकासकामाला सुवर्ण दिवस येतील.

उमेदवार टिळेकर म्हणाले, "ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली, त्यांच्या आर्शीवादाने माझा विजय निश्चित आहे. हडपसर मतदार संघात विकास झाला. येथील प्रश्न प्राधान्याने विधानसभेत मांडून विकास निधी आणला.  

या भागातील मांजरी उड्डाणपूल पूर्ण होणार, सय्यदनगर येथील भुयारी मार्ग सुरु केला. बी.टी. कवडेरोड, कोंढवा आदी भागातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उड्डाणपुल उभारणी केली. हडपसरला मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे. थेऊर ते कात्रज हा रस्ता लवकर पूर्ण करणार, हडपसर परिसराला पाणी योजना अमलात आणणार आहे. या सर्व विकास कामाच्या आधारेच मला विजयाची पावती नागरिक देतील. विरोधक वाटेल ते खोटे आरोप माझ्यावर करीत आहेत त्या आरोपात तथ्य नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com