ट्रॅक्टरच्या धडकेत 
दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published on

वडगाव निंबाळकर, ता. २६ : नीरा-बारामती मार्गावर वडगाव निंबाळकर येथे ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. रणजित सोमनाथ शेवाळे (वय २६, रा. कोहाळे खुर्द-लिप्टवस्ती) असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अभिजीत शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एमएच ४२ बीबी ०७३९) पाठीमागे उसाने भरलेले दोन चारचाकी ट्रेलर जोडून नीरा बाजूकडून बारामतीकडे जात होता. त्याचवेळी बारामती बाजूकडून नीरा बाजूकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच ४२ बीआर ६४६५) रणजित शेवाळे यांच्या ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. धडकेनंतर ट्रॅक्टर चालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर धिरन पवार, प्रवीण चोरगे, मयूर आगम व सौरभ दरेकर यांनी जखमी रणजित यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत रणजीत याचा वाहतूक व्यवसाय होता. नियमित रस्त्यावर चारचाकी वाहन चालविणाऱ्या रणजीतचा दुचाकी अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com