झाड कोसळून वाहनांचे नुकसान
झाड कोसळून वाहनांचे नुकसानsakal

झाड कोसळून वाहनांचे नुकसान

सांबर हॉटेल समोरच्या पदपथावरील गुलमोहरचे झाड रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळले

वडगाव शेरी : विमाननगर येथे सांबर हॉटेल समोरच्या पदपथावरील गुलमोहरचे झाड रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळले. या मध्ये एका दुचाकीचे आणि दोन चारचाकींचे नुकसान झाले. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी दोनच्या सुमारास हे झाड बाजूला हटवले. ज्या वाहनांवर झाड कोसळले त्या वाहनांचे मालक जागेवर नसल्यामुळे झाड बाजूला हटवण्यासाठी उशीर झाला.

उजनी वाघाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून वाहनांच्या मालकांचा संपर्क क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला. झाड मोठे असल्यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. आणि कार्यकर्ते फिरोज शेख यांनी आणि परिसरातील नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com