वागदरी येथे विकास कामाचे भूमिपूजन

वागदरी येथे विकास कामाचे भूमिपूजन

Published on

WDR26A00397
वागदरी (ता. अक्कलकोट) : येथे विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.
---
वागदरी येथे विकासकामांचे भूमिपूजन
वागदरी : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी त्यांच्या आमदार निधीतून विकासकामांचे भूमिपूजन रेवाप्पा यमाजी व सिद्धप्पा यमाजी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच शिवानंद गोळसगाव होते. वागदरी येथील मुख्य बाजारपेठेत सिमेंट रस्त्याचे काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण बाजारपेठ चिखलमय होत होता. बसवेश्वर मंदिरापासून ते बस स्थानकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. परंतु उर्वरित कामासाठी निधी कमी पडल्याने काम रखडले होते. आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे उर्वरित कामांसाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करून १४ लाखांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कणमुसे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष शानप्पा मंगाने, माजी पंचायत समिती सदस्य धोंडप्पा यमाजी, माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी, उपसरपंच पंकज सुतार, जयश्री बटगेरी, शारदा होटे, हनीफ मुल्ला आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com