वागदरी जिल्हा परिषद गटातील निवडणुकी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रतिष्ठेची तर आनंद तानवडे यांची अस्तित्वाची लढाई

वागदरी जिल्हा परिषद गटातील निवडणुकी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रतिष्ठेची तर आनंद तानवडे यांची अस्तित्वाची लढाई

Published on

वागदरी जिल्हा परिषद गट

कल्याणशेट्टींना प्रतीष्‍ठेची, तानवडेंसाठी अस्तित्वाची लढाई

वागदरी गटातील निवडणुकीच चुरस; अक्कलकोट तालुक्याचे लागले लक्ष


सोन्याबापू शिरगापुरे ः सकाळ वृत्तसेवा
वागदरी, ता. १ ः वागदरी जिल्हा परिषद गट व त्याअंतर्गत येणाऱ्या वागदरी व शिरवळ या गणांची निवडणूक ही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना प्रतिष्ठेची तर माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्यासाठी अस्तित्वाची लढत मानली जात आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष वागदरी जिल्हा परिषद गटाकडे लागले आहे.
वागदरी जिल्हा परिषद गटासाठी भाजपच्या राजश्री बसवराज शेळके तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रवीण दत्तात्रय तानवडे यांच्यात लढत होत आहे. वागदरी पंचायत समिती गणासाठी भाजपचे आप्पासाहेब किवडे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून संजय होळे तर शिरवळ गणासाठी भाजपकडून माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र बंदीछोडे त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून गणेश मोरे अशी अतिशय प्रतिष्ठेची व चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे.
अक्कलकोटच्या राजकारणात भाजपसाठी तानवडे घराण्याचे मोठे योगदान आहे. माजी आमदार कै. बाबासाहेब तानवडे तसेच दत्तात्रय तानवडे यांची तर अलीकडच्या काळात भाजपकडून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य निवडणूक जिंकून विरोधी पक्षनेतेपर्यंत मजल मारलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी भाजसाठी योगदान दिले होते. परंतु २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आनंद तानवडे यांनी भाजपतील असंतुष्ट लोकांना एकत्र घेऊन भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांचा प्रचार केल्याची चर्चा भाजपच्या गोटात व कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी व जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्यातील राजकीय शत्रुत्व संपूर्ण तालुक्याने अनुभवले आहे. परंतु २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कल्याणशेट्टी व तानवडे यांचे मनोमिलन होऊन २०२४ च्या आमदारकीच्या निवडणुकीत तानवडे यांनी भाजपकडून वागदरी जिल्हा परिषद गटात कल्याणशेट्टींसाठी काम केले. पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आनंद तानवडे यांना उमेदवारी मिळवायची होती. परंतु तिसरा अपत्यामुळे त्यांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागले. तिसऱ्या अपत्य मुळे अपात्र ठरलेले तानवडे यांनी त्यांचे चुलत बंधू प्रवीण तानवडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे प्रयत्न केले. परंतु आमदार कल्याणशेट्टी यांनी त्यांची उमेदवारी नाकारली. कल्याणशेट्टी यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर समर्थक असलेले एस. एस. शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके यांच्या पत्नी राजश्री शेळके यांना उमेदवारी दिली. नाराज झालेले तानवडे यांनी बंडाचा झेंडा हाती घेऊन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

निकालच ठरवणार भवितव्य
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या वागदरी जिल्हा परिषद गटात भाजपचे फिक्स मतदार आहेत. आमदार कल्याणशेट्टी यांना मानणारा त्यांचा वर्ग आहे. दुसरीकडे आनंद तानवडे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना वागदरी गटात सर्वांत जास्त निधी खेचून आणून प्रत्येक गावात विकासकामे केली आहेत. तानवडे यांना मानणारा एक गट आहे. या सर्वांचा फायदा तानवडे यांना होणार की पक्ष सोडून गेल्याचा फटका बसणार हा येणारा काळच ठरवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com