Pune Hoarding Accident : वाघोलीत होर्डिंगस् मुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच; दुचाकीधारक दाम्पत्य जखमी

होर्डिंगस् मुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाघोलीत होर्डिंगस् वरील फ्लेक्स फाटून दुचाकीधारक दाम्पत्य जखमी झाले.
Pune Hoarding Accident
Pune Hoarding Accidentsakal

wagholi news - होर्डिंगस् मुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाघोलीत होर्डिंगस् वरील फ्लेक्स फाटून दुचाकीधारक दाम्पत्य जखमी झाले. तर लोणीकंद येथे होर्डिंगसचा लोखंडी रॉड तुटून कारचे मोठे नुकसान झाले.

पाच दिवसांपूर्वी वाघोलीत एच पी पेट्रोल पंपा समोर वादळामुळे दुचाकी वर जाणाऱ्या दाम्पत्याच्या अंगावर होर्डिंगसचा फ्लेक्स आल्याने ते पडून जखमी झाले. (Latest Marathi News)

तर रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सणसवाडी येथील बापू तुकाराम हरगुडे हे कार मधून जात असताना लोणीकंद येथे वादळामुळे त्यांच्या कारवार होर्डिंगसचा रॉड तुटून पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. त्यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Hoarding Accident
Baramati News : बारामतीतील डॉक्टर देवदूत बनून आले आणि रुग्णाचे प्राण वाचले...

पुणे नगर महामार्गालगत अनेक होर्डिंगस् आहेत. परवाना नसलेल्या अनेक होर्डिंगस् महापालिकेने कारवाई करून पाडले आहेत. मात्र अद्यापही अनेक आहेत.

तर ग्रामीण भागातील विनापरवाना होर्डिंगस् वर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक होर्डिंगस दिसून येतात. वादळामुळे या होर्डिंगस वरील फ्लेक्स फटण्याचा प्रकार घडतो. (Marathi Tajya Batmya)

हे फ्लेक्स कुठेही लटकत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर होर्डिंसही तुटल्याच्या घटना घडतात. यामुळे अनधिकृत होर्डिंगस वर लवकर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ज्या होर्डिंगस ला परवाना आहे त्यांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे व ते सुरक्षित नसल्यास काढून टाकावे. असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Pune Hoarding Accident
Student Uniform : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश

माझ्या समोर होर्डिंगस वरील फ्लेक्स फाटून दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. यामुळे परवाना नसलेल्या होर्डिंगस वर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे.

- गणेश सातव, युवा सेना अधिकारी, पुणे जिल्हा ,शिवसेना (शिंदे गट)

होर्डिंगस तपासणीचे काम सुरू असून अनधिकृत होर्डिंगस वर निश्चित कारवाई होणार आहे.-

- सोमनाथ बनकर, सहायक आयुक्त, नगररोड - वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com