
पुणे: वाघोली येथे अपघातात जखमी झालेल्या ६ रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सूरू असून त्यापैकी १९ वर्षीय जानकी पवारची प्रकृती ही अद्याप गंभीरच आहे. तिला सध्या ट्रॉमा विभागाच्या अतिदक्षता कक्षातील कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे. मंगळवारी डॉक्टरांनी ती स्वतंत्रपणे श्वास घेते का हे पाहण्यासाठी तिचा कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणा काढून पाहिली परंतु, ती स्वतःहून श्वास घेऊ शकत नसल्याने पुन्हा तिला कृत्रिम श्वसनयंत्रणा लावली. तर उर्वरित पाच रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.