esakal | वाघोलीत घरगुती बाप्पाला निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोलीत घरगुती बाप्पाला निरोप

वाघोलीत घरगुती बाप्पाला निरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जय घोषात अगदी साधे पणाने घरगुती बाप्पाला निरोप देण्यात आला. महापालिकेच्या वतीने दोन फिरते हौद व वाघेश्वर मंदिरात मूर्ती संकलनाची सोय करण्यात आली होती. लोणीकंद पोलिसानी बंदोबस्त ठेवत गर्दी होऊ दिली नाही.

वाघेश्वर मंदिर परिसरात मूर्ती संकलनाची सोय करण्यात आली होती. तेथे विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येकाची नोंद करण्यात येत होती. सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत 80 मुर्त्या संकलित झाल्या होत्या. महापालिकेच्या महिला सफाई कर्मचारी प्रवेशद्वारा वर निर्माल्य गोळा करीत होत्या. मूर्ती विसर्जनासाठी संकलित मंडपा पर्यंत दोघांनाच सोडण्यात येत होते. एकावेळी एकालाच प्रवेश असल्याने कोठेही गर्दी जाणवली नाही. मंदिराच्या बाहेर भाविक शेवटची आरती करीत होते.

हेही वाचा: मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढला म्हणून माझ्या अटकेचे आदेश: किरीट सोमय्या

महापालिकेच्या दोन फिरत्या हौदाबरोबरच काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फिरत्या हौदाची सोय केली होती. यामुळे अनेकांनी त्या हौदात विसर्जन केले. विहीर, तळे अशा कोणत्याही ठिकाणी विसर्जन नागरिकांनी केले नाही. सोसायटी, मंडळे यांनीही अगदी सध्या पद्धतीने गर्दी न करता विसर्जन केले. लोणीकंद पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, उपनिरीक्षक पवार, यांनी कर्मचाऱ्यासाहित तसेच गुन्हे शाखा युनिट सहाच्या कर्मचारी यांनी सर्वत्र फिरून गर्दी, जल्लोष होणार नाही यासाठी कडक बंदोबस्त ठेवला. महापालिका कर्मचाऱ्यांनाही गर्दी होऊ न देता मूर्त्यांचे संकलन केले.

दुकाने सुरूच

अत्यावशक्य सेवा वगळता दुकाने बंद ठेवण्याचे महापालिकेचे आदेश होते. मात्र दुकाने सर्वत्र सुरूच होती.

मास्कचा वापर

विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्कचा आवर्जून वापर केल्याचे दिसून आले. विसर्जनासाठी कुटुंबातील दोन किंवा तीन सदस्यच आलेले दिसून आले.

loading image
go to top