वाघोली : "कोरोना लसीकरण ही राष्ट्रीय मोहीम, कोणीही श्रेयवादात पडू नये"

श्रेयवादामुळे त्रास सोसावा लागणाऱ्या वाघोलीकरांची भावना
Shiv Sena and NCP are using flex in Wagholi to get credit of covid care center
Shiv Sena and NCP are using flex in Wagholi to get credit of covid care center

वाघोली : कोरोना लसीकरण (corona vaccination) ही राष्ट्रीय मोहीम (national campaign) आहे, त्यात कोणीच श्रेय घेण्याचे काम नाही. तुमचा श्रेय वाद बाजूला ठेवा सुरक्षित आणि लवकर लसीकरण होईल या कडे लक्ष द्या, असं मत वाघोलीतील नागरिक (Wagholi people) व्यक्त करीत आहेत. वाघोलीत सध्या लसीकरणावरून राजकीय पुढाऱ्यांमध्ये श्रेयवाद सुरू आहे. या वादातूनच लसीकरण केंद्र हलविण्याचा प्रकार नुकताच घडला होता. (Wagholi Corona vaccination is a national campaign no one should take credit)

Shiv Sena and NCP are using flex in Wagholi to get credit of covid care center
पुणे : मार्केट यार्डात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अडत्यांवर कारवाई!

जानेवारीत लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर बीजेएस संस्थेच्या हॉलमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली. यानंतर मार्चमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागले, त्यामुळे बंद केलेले बीजेएस कोविड केअर केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी राज्यात महाविकास आघाडी असताना केवळ शिवसेना पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र छापून सर्वत्र फ्लेक्स लावले. यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज झाले. त्यांनीही आपल्या नेत्यांचे छायाचित्र छापून फ्लेक्स लावले. हे प्रकरण एवढ्यावरच होते. मात्र, कटके यांनी काही सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण मोहीम राबविली. केंद्रात लस शिल्लक नाही असे सांगायचे आणि स्वतःचे फ्लेक्स लावून सोसायटीमध्ये लसीकरण करायचे असा आरोप राष्ट्रवादीने केला. अखेर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार केली. हा वाद सुरू असतानाच प्राथमिक आरोग्य केंद्र हे लसीकरणाचे मान्यताप्राप्त ठिकाण असल्याचे कारण देऊन बीजेएस लसीकरण केंद्र आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.

राजकीय हस्तक्षेप तोच फक्त पक्ष बदलला

प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र हलविल्यानंतर शिवसेनेऐवजी तेथे राष्ट्रवादीचे फ्लेक्स लागले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची जागा घेतली. तेथे चांगलाच गोंधळ उडाला. लसीकरणासाठी आलेल्या एका जेष्ठ नागरिकांची प्रतिक्रिया घेऊन लसीकरण सुरळीत असल्याचे राष्ट्रवादीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून दिले.

फॅक्ट बदलत नाही

सुमारे 10 हजार चौरस फूट जागेतून केंद्र हलवून दोन खोल्यामध्ये सुरू करण्यात आले. या तोकड्या जागेमुळे अनेक समस्या निर्माण होत असून त्या नाकारता येणाऱ्या नाहीत. सुरळीत लसीकरण सुरू असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी तेथे उडणारा गोंधळ फॅक्ट बदलू शकत नाही.

बीजेएसला घेता आली असती मान्यता

केंद्र हलविण्यापेक्षा मोठ्या जागेचा विचार करून त्या जागेची मान्यता घेता आली असती. वाद होऊ नये यासाठी केंद्र परिसरातील सर्वांचे फ्लेक्स हटवून राजकीय हस्तक्षेप दूर करून तेथेच सुरळीत लसीकरण सुरू ठेवता आले असते. मात्र, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र जागे अभावी अडचणीचे ठरू शकते हे माहिती असताना ते हलविले.

आता प्रत्यक्ष वादाचीच ठिणगी

प्राथमिक आरोग्य लसीकरण केंद्र परिसरात राष्ट्रवादीने फ्लेक्स लावल्यानंतर शिवसेनेनेही फ्लेक्स लावले. मात्र शिवसेनेचे फ्लेक्स फडण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे समजते. यामुळे प्रत्यक्ष वादाचीच ठिणगी पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दोघांचंही चुकलं

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेने केवळ आपल्याच पक्षाचे फ्लेक्स लावणे चुकीची बाब आहे. तसेच स्वतःच्या बॅनर खाली असे सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण करणे हे ही चुकीचे असल्याचे मत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. तर नागरिकांची सुरक्षितता व झटपट लसीकरण हे दोन मुद्दे महत्वाचे होते. ते छोट्या जागेत हलवून नागरिकांना अडचणीत टाकण्यापेक्षा त्यावर तोडगा काढला पाहिजे होता, असे मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

वाद विसरून एकत्र या

कोरोनामुळे नागरिकांचे जीव जात आहेत, ही राजकारण करण्याची वेळ नाही. कोरोनाचा नायनाट झाल्यानंतर पाहिजे तेवढे राजकारण करा. मतदार हे समजदार आहेत. सगळे वाद विसरून एकत्र या आणि सुरक्षित व जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल या कडे लक्ष द्या. लसीकरण हे काही काळ चालणारी मोहीम आहे. केंद्रावरील फ्लेक्सबाजी राजकीय हस्तक्षेप काढून टाका. सरकारी यंत्रणेला त्यांचे काम करू द्या. त्यांना अराजकीय मनुष्यबळ पुरवा, असा सूर विविध पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला यांच्याकडून उमटू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com